भारतातील अध्यात्म क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक लोक जागरती संस्था.
मिशनची उद्दिष्टे :- शांती व समतेचा संदेश सर्वत्र पोचविणे सामाजिक तथा आध्यात्मिक उपक्रम राबविणे.
संतकृपा झाली ! इमारत फळा आली !! ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारिले देवालया !! नामा तयाचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !! जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत !! तुका झालासे कळस ! भजन करा सावकाश !!
'स्वामी विवेकानंद सनातन मानवी धर्म संस्था ' ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. 'सनातन संस्थे'चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी 'सनातन संस्था' विविध उपक्रम राबवते. 'धर्मो रक्षति रक्षित: ।', म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही. समाजाची धर्माबद्दलची उदासीनता दूर करण्यासाठी, धर्माचा बुरखा पांघरून समाजात शिरलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी, तसेच समाजाला खरा धर्म समजावून सांगण्यासाठी सनातन कार्यप्रवण झाले आहे.
हिंदु धर्मजागृती सभा, पाश्चात्यांचे अंधानुकरण टाळा, देवतांचा अवमान रोखा धर्मशिक्षणविषयक फलक प्रदर्शन उत्सवातील अपप्रकार रोखा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न कुंभमेळ्यामध्ये धर्भजागृती देवालय स्वच्छता, जत्रा सुनियोजन, नद्या आणि तीर्थक्षेत्रे यांच्या पावित्र्य-रक्षणाविषयी जागृती.
भारतातील अध्यात्म क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक लोक जागरती संस्था.
. . . “श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ! “
. . . “अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् . !! “ ( नवविधा भक्ति )
” कीर्तन ” शब्दाचा उगम संस्कृत ” कीर्त ” (१० आ.) धातूपासून झाला आहे. प्रशंसा, गुणवर्णन , पराक्रम , लीलाचरित्र , स्तुतिपाठ करणे . अर्थात थोडक्यात सांगायचे तर परमेश्वराच्या चरित्राचे कथाकथन, दैवी गुणांचे आणि विभूतींच्या पराक्रमाचे कीर्तीगान किंवा कथाकथन म्हणजेच कीर्तन होय.
हरिकीर्तनाची परंपरा सर्व भारतात फार प्राचीन काळापासून आहे. गावा-गावातून पुराण, प्रवचन आणि कीर्तनाचे आयोजन फार पूर्वीपासून केले जाते. टाळ मृदुंगाच्या साथीत हरीनामा बरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तन सर्वाना माहित आहेच. कीर्तनात नारदीय, वारकरी, रामदासी आणि राष्ट्रीय कीर्तन असे ठळक भेद मानले जात असले तरी कीर्तन हे मुळात ” अध्यात्म मार्गाचे एक साधन ” म्हणून आणि ” नवविधा भक्तीचा एक प्रकार ” म्हणून सर्वश्रुत आहे. पुराणातील आदर्श हरीभक्त आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले देवर्षी नारद हेच कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात, इतकी ही कीर्तनाची जुनी पद्धती आहे. भारतात सर्व राज्यात कीर्तन परंपरा थोडयाफार फरकाने आहेच.महाराष्ट्रात कीर्तन, गुजरातेत संकीर्तन, उत्तरेत हरिकीर्तन , दक्षिणेत हरिकथा , आंध्रात कथाकली, तर पंजाबात गुरुद्वारात होणारे शबद-कीर्तन म्हणून कीर्तनच सादर होत असते. कथानके मुख्यतः पुराणे, रामायण, महाभारतावर व देशातील संत परंपरा आणि इतिहास यावर आधरित असतात.
Website : https://purandare.constantcontactsites.com/
No comments:
Post a Comment